Unlock : शाळा-महाविद्यालये, प्रार्थनास्थळे अन् जिम बंदच, जाणून घ्या आजपासून काय सुरू होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या या संकटात सरकारने अनलॉक करताना या महिन्यात नवीन निर्णय घेतले आहेत. य महिन्यापासून विविध गोष्टी सुरु करण्यात आल्या असून महत्वाचे म्हणजे मेट्रो सेवा य महिन्यात सुरु होणार आहे.आठवडाबाजार, सरकारी आणि खासगी ग्रंथालये उघडण्याची परवानगी देण्यात आली असून दुकानांच्या वेळाही दोन तासांनी वाढविण्यात आल्या आहेत. पण मंदिरे, शाळा महाविद्यालये आणि जिमबाबत सरकारने अजूनही निर्णय घेतलेला नाही. या गोष्टीदेखील टप्प्याटप्प्याने उघडण्याचा सरकारचा मानस आहे.

मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य सरकारने बुधवारी नवीन नियमावली जारी केली. यामध्ये विविध आस्थापनांची वेळ वाढवण्यात आली आहे तर आस्थापने नव्याने उघडली जाणार आहेत. य नवीन नियमांमध्ये शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणाच्या कामांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबईत सोमवारी १९ ऑक्टोबरपासून मेट्रो सुरु होणार आहे.त्याचबरोबर विमान किंवा रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या हातावर शिक्के मारले जाणार नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.त्यामुळं उद्यापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा येथे थिएटर्स सुरु होणार आहेत. तर १९ ऑक्टोबरपासून,मुंबईमध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो तर १८ ऑक्टोबरपासून वडाळा-चेंबूर-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर मोनोरेल धावणार आहे.

आजपासून काय सुरू होणार ?
१)आजपासून दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालवधीत सुरु राहणार आहेत.
२)सरकारी व खासगी ग्रंथालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाबाबतची नियमावली पाळणे बंधनकारक
३)प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बिझनेस टू बिझनेस प्रदर्शनांनाही नियमावलीअंतर्गत परवानगी
४)जनावरांच्या बाजारांसह आठवडाबाजार सुरू करण्याची परवानगी
५)राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य आणि उद्योजगता प्रशिक्षणाला त्याचबरोबर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कौशल्य विकास अभियान, या प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकवायला परवानगी