नीति आयोगाच्या प्रमुखांचा ‘गंभीर’ इशारा ! 70 वर्षातील सर्वात ‘खराब’ अर्थव्यवस्था (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीचे सावट घोंगावत असताना नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी यावर भाष्य करताना म्हटलं कि, केंद्र सरकारला यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे खासगी कंपन्या पुढे येऊन त्यामधील गुंतवणूकदार वाढतील. अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्षपणे तयार झालेला दबाव दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणात प्रगती करण्याची संधी निर्माण होईल.

पुढे बोलताना कुमार म्हणाले कि, अर्थव्यवस्थेत सुरु असलेल्या या संकटाचा प्रभाव आता आर्थिक विकास दरावर देखील दिसून येत आहे. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीस प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत तेजी येईल आणि ती मार्गावर लागण्यास मदत होईल. मागील 70 वर्षात अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था कधीही झाली नाही. खासगी क्षेत्रावर कुणीही विश्वास ठेवण्यास आणि कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे हे पैसे बाजारात आणण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात रोख रक्कम जमा करण्याचे प्रयत्न केले जात आहे. अर्थव्यवस्थेची अशी अवस्था हि 2009-14 च्या दरम्यान देण्यात आलेल्या बेहिशेबी कर्जामुळे झाली आहे. यामुळे 2014 नंतर बँकांच्या एनपीएमध्ये वाढ झाल्याने बँका डबघाईला आल्या. त्यामुळे खासगी कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर याचा जोर आला आणि यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली.

नोटबंदी आणि जीएसटी नंतर रोख व्यवहारांत घट
कुमार यांनी नोटबंदीआणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत नोटांचे प्रमाण कमी झाल्याने देखील हि परिस्थिती उद्भवल्याचे म्हटले आहे. यावर काहीतरी मोठे समाधान काढण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले. त्याचबरोबर सरकारकडे जमा होणाऱ्या करांमध्ये होणाऱ्या उशिरामुळे हि परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like