कानातील ‘मळ’ काढण्याचा सर्वात ‘उत्तम’ पर्याय, ऐकण्याची ‘ताकद’ देखील काही पटीनं वाढणार

पोलीसनामा ऑनलाईन : आपल्या शरीराबरोबरच कानाची स्वच्छतादेखील तितकीच महत्वाची आहे. कान स्वच्छ नसल्याने विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कान स्वच्छ न केल्यास आतली घाण जमा होत राहते, आणि तर एक दिवस कानात दुखण्याची समस्या उद्भवते, ज्यामुळे आजाराला देखील निमंत्रण मिळू शकते. यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका देखील असतो. त्यामुळे जर आपलाही कान दुखत असेल आणि आपण बराच काळ आपले कान स्वच्छ केले नसतील तर त्यासाठी ५ महत्वाचे असे सोपे घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे कमी खर्चात आपण कान स्वच्छ करू शकता.

१) पहिल्यांदा अर्धा कप गरम पाणी घ्या आणि त्यात एक छोटा चमचा मीठ मिसळा. नंतर त्यात कापसाचा तुकडा भिजवा आणि कानात राहील असे पाणी पिळून घ्या. लक्षात घ्या कि, पाणी आतमध्ये चांगले गेले पाहिजे. यानंतर, कान फिरवा आणि त्यातून सर्व पाणी काढा.

२) बेबी ऑईलच्या मदतीने कानातील घाण देखील साफ केली जाऊ शकते. यासाठी प्रथम तुम्ही कानात बेबी ऑईलचे काही थेंब टाका आणि कापूस लावा. हे थोड्या वेळात आपल्या कानातील जमा झालेले वॅक्स नरम करेल, जेणेकरुन वॅक्स सहज बाहेर येईल.

३) हायड्रोजन पॅराऑक्साईड आणि पाण्याचे थेंब समान प्रमाणात घ्या आणि ते कानात घाला. जेव्हा ते कानात व्यवस्थित जातील, थोडा वेळ सोडल्यानंतर, कान फिरवा जेणेकरून पाणी बाहेर येईल. परंतु हे लक्षात ठेवा की हायड्रोजन पॅराऑक्साइडचे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. कानाची घाण या वापराद्वारे सहजपणे देखील काढली जाते.

४) ऑलिव्ह ऑईलने कानाची घाण देखील काढली जाऊ शकते. यासाठी रात्री तुम्हाला कानात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालावे लागतील. सुमारे ३ ते ४ दिवस असे केल्याने कानाची घाण मऊ होईल आणि वॅक्स सहज बाहेर येईल.