मृत्यूशी 44 तास झुंज दिली ‘उन्नाव’च्या मुलीनं, पिडीतेला वाचवता न आल्यानं ‘रडू’ कोसळलं डॉक्टरांना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला आपला जीव गमावावा लागला. 44 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितेने शुक्रवारी रात्री 11.40 वाजता सफदरजंग रुग्णालयात आपला जीव सोडला. पीडितेचा जीव वाचवू न शकल्याने त्याची खंत डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. पीडितेची परिस्थिती पाहून डॉक्टरांच्या डोळ्यांत देखील अश्रू आले. डॉक्टरांनी सांगितले की पीडितेला नवे आयुष्य देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला, परंतू त्यात आम्ही यशस्वी ठरलो नाही.

बर्न यूनिटचे प्रमुख डॉ. शलभ आणि चिकिस्ता अधीक्षक डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले की 90 टक्के भाजल्या कारणाने पीडितेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ कमी झाले होते. पीडितेची परिस्थिती एवढी वाईट होती की दोन शब्द बोलून ती बेशुद्ध झाली होती. तिचे महत्वाचे अवयव संध्याकाळपर्यंत काम करत होते. परंतू त्यानंतर तिची तब्येत नाजूक होत गेली.

डॉक्टरांना सर्वात जास्त भीती होती ती इन्फेक्शन शरीरात पसरण्याची आणि तसेच झाले. पीडितेच्या शरीरात मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन पसरले. डॉक्टरांनी पहिल्यांदाच याबाबत माहिती दिली होती की शरीरात इन्फेक्शन पसरले तर त्याला नियंत्रित करणे अवघड होईल. सांगितले जाते की बर्न केसमध्ये अनेक रुग्णाचा मृत्यू शरीरात इन्फेक्शन पसरल्याने होतो.

उन्नाव प्रकरणातील तरुणीला उपचारासाठी लखनऊ आणि नंतर एअरलिफ्ट करुन दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 90 टक्के जळालेली पीडित तरुणी गुरुवारी 9 वाजेपर्यंत शुद्धीत होती, सांगत होती की मला जाळणाऱ्यांना कोणत्याही परिस्थिती सोडून नका.

जळालेल्या परिस्थिती पुढील 72 तास असतात महत्वाचे
सफदरजंग रुग्णालयातील बर्न आणि प्लास्टिक विभागाचे एचओडी डॉ. शलभ कुमार यांनी सांगितले की या प्रकराच्या घटनेत सुरुवातीचे पहिले 72 तास अत्यंत महत्वाचे असतात. जर तीन दिवस ठीक राहिले असते तर पीडितेला वाचवण्यात यश आले असते. उन्नावच्या पीडितेने 44 तासातच जीव सोडला.

मला जाळणाऱ्यांना सोडू नका –
90 टक्के जळालेल्या या उन्नावच्या निर्भयाने शेवटपर्यंत हार मानली नाही. गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत ती शुद्धीत होती. जेव्हापर्यंत शुद्धीत होती तोपर्यंत म्हणत होती की मला जाळणाऱ्यांना सोडून नका. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, वेंटिलेटरवर ठेवले परंतू ती उठली नाही आणि त्यानंतर तिने जीव सोडला. न्यायाचा लढा लढता लढता आणखी एका निर्भयाने आपला जीव सोडला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like