उन्नाव रेप केस : भाजपनं निलंबीत केलेला MLA कुलदीप सेंगर ‘दोषी’, शिक्षेवर 17 नोव्हेंबरला सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार खटल्यात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरविले आहे. न्यायालयाने सहआरोपी महिला शशि सिंहची मुक्तता केली आहे. शशि सिंह नोकरी देण्याच्या निमित्ताने पीडितेला कुलदीप सेंगरकडे घेऊन गेली होती. यानंतर सेंगरने पीडितेवर बलात्कार केला होता. आता या शिक्षेवर १९ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

तीस हजारी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयलाही फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले की, पीडितेने तिचा आणि कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी उशीरा गुन्हा दाखल केला. आम्ही पीडितेची व्यथा समजू शकतो. पीडितेवरील सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यात सीबीआयने चार्जशीट दाखल करण्यास एक वर्ष का लावले? असा सवाल न्यायालयाने विचारला.

तीस हजारी न्यायालयाने कुलदीप सेंगरला कलम १२० ब (गुन्हेगारी कट), ३६३ (अपहरण), ३६६ (विवाहासाठी महिलेवर जबरदस्ती, अपहरण आणि छळ), ३७६ (बलात्कार) आणि पॉक्सोअंतर्गत दोषी ठरविले आहे.

सध्या एकाच खटल्याचा निकाल
याप्रकरणी एकुण ५ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी एकावर आज कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे. इतर खटल्यांवर अजूनही याच न्यायालयात सुनावणी सुरू आहे, ज्यामध्ये पीडितेच्या वडीलांचा कोठडीत झालेला मृत्यू, रस्ता अपघातात तिच्या कुटुंबातील दोन महिलांचा झालेला मृत्यू, पीडितेवर झालेला सामुहिक बलात्कार आणि पीडितेच्या चुलत्याविरोधात दाखल झालेला खोटा गुन्हा, आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.

जून २०१७मध्ये सेंगरने पीडितेचे अपहरण करून बलात्कार केला होता. यावेळी ती अल्पवयीन होती. उत्तर प्रदेशच्या बांगरमऊमधून सेंगर चार वेळा भाजपाचा आमदार म्हणून निवडून आला आहे. मागच्या ऑगस्ट महिन्यात भाजपाने त्यास पक्षातून काढले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/