उन्नाव केस : पिडीता ‘व्हेंटीलेटर’वर – ‘मरायचं नसल्याचं तिनं सांगितलं’, डॉक्टर म्हणाले – ‘आगामी 48 तास महत्वाचे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला राजधानी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. तीची प्रकृती सुधारत नसल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाकडून मिळाली असून ती सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. तथापि, डॉक्टर तीला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

शुक्रवारी रुग्णालयातून असे सांगण्यात आले की पीडित महिला जवळपास ९० टक्के जळालेल्या अवस्थेत आहे, अशा परिस्थितीत त्यांचे प्राण वाचणे अवघड आहे. सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, पीडिता सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तास फार महत्वाचे आहेत.

उन्नाव बलात्कार पीडितेला गुरुवारी रात्री उशिरा लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून एअरलिफ्ट करण्यात आले आणि तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पीडितेचा भाऊ म्हणाला – आरोपींना सोडू नका
उन्नाव येथील पीडित मुलीवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान पीडित मुलीने आपल्या भावाला सांगितले की आरोपींना सोडू नका. पीडितेने म्हटले की तिला जगायचे आहे, आरोपींना सोडू नका. पीडितेची प्रकृती आता गंभीर आहे.

याप्रकरणी ५ आरोपींना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार पीडितेला जाळल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित मुलीवर उपचार करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Visit : Policenama.com

 

You might also like