BJP आमदारावर ‘रेप’चा आरोप करणार्‍या तरूणीच्या कारचा भीषण अपघात, काकू आणि वकिलाचा जागीच मृत्यू

उन्नाव : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील भाजप आमदार कुलदिपसिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेचा अपघात झाला आहे. हा अपघात आज रायबरेली येथे झाला. पीडित तरुणी कारने रायबरेली जेलमध्ये असलेल्या तिच्या काकांना भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी कारमध्ये तिची काकू आणि वकील होते. दुपारी अतरुआ गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये पीडित तरुणीची काकू आणि वकील महेंद्र सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

आमदार कुलदिपसिंह सेंगर २०१८ मध्ये चर्चेत आला. कुलदीप सिंह सेंगर आणि त्याचा भाऊ अतुल सिंह याच्यावर गावात राहणाऱ्या एका मुलीने सामुहिक बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणात कुलदीप सेंगर आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून कुलदीप सेंगर सध्या जेलमध्ये आहे. सामुहिक बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबाचे आणि सेंगर यांच्यात मैत्रीचे संबंध होते. तरुणीच्या म्हणण्यानुसार तिचे वडिल कुलदीपसोबत राहत होते. दोघांची घरे जवळ-जवळ असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते. काहीवेळी कुलदीप हा पीडित तरुणीच्या घरी जात असत तर पीडित तरुणी कुलदीपच्या घरी जात होती.

दरम्यान, ४ जून २०१७ मध्ये आमदार कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर साथीदारांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. कुलदीपवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ८ महिने वाद झाले. घटनेदीवशी आरोपींनी पीडित तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर याबाबत बाहेर वाच्चता केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर एका आठवड्याने पीडित तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची विक्री करण्यात आली. यातून सुटल्यानंतर तिला दिल्ली येथील तिच्या काकांच्या घरी पाठवण्यात आले.

पीडित तरुणीने तिच्या बाबतीत घडलेली सर्व हकिकत काकूला सांगितली. त्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर सीबीआयने कुलदीप सेंगरला अटक केली. दरम्यान, पीडित तरुणीच्या वडिलांचा तुरुंगात मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूला सेंगर जबाबदार असल्याचा आरोप कुलदीप याच्यावर लावण्यात आला. तर पीडित तरुणीच्या काकाला दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये जेल झाली आहे. त्याला भेटण्यासाठी पीडित तरुणी जेलमध्ये जात होती.

आज झालेल्या अपघातात पीडित तरुणीची काकू आणि वकीलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नागरीकांनी व्यक्त केला आहे. जाणून बुजून हा अपघात घडवून आणण्यात आला आहे. जेणे करून पीडित तरुणीचा यामध्ये मृत्यू होईल. ज्यामुळे आरोपी आमदाराला जेलमधून बाहेर येता येईल असा आरोप नागरीकांकडून करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त