उन्नाव बलात्कार प्रकरण : आ. कुलदीप सेंगरवर 19 डिसेंबर रोजी न्यायालय देणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणी दिल्ली कोर्टाने आज आपला निर्णय राखून ठेवला आहे. भाजपाचे माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना शिक्षा होईल की नाही, यावर आता कोर्ट १६ डिसेंबरला निर्णय देणार आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कुलदीपसिंग सेंगर आणि शशी सिंग यांच्यावर न्यायालय निकाल देणार आहे, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप सेंगर दोषी ठरल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तसेच शशी सिंह याच्यावर पीडितेला आमदार सेंगरकडे नेल्याचा आरोप आहे. जेथे पीडित मुलीवर बलात्कार केला गेला होता. या संपूर्ण प्रकरणात ५ एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीपसिंग सेंगर सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२० बी (गुन्हेगारी कट रचणे), ३६३ (अपहरण), ३६६ (लग्नासाठी महिलेचे अपहरण आणि लग्नासाठी दबाव आणणे), ३७६ (बलात्कार) आणि बाल लैंगिक गुन्हेगारी संरक्षण अधिनियम (पॉक्सो) च्या संबंधित कलमांनुसार आरोप दाखल केले आहेत.

Visit : Policenama.com