उन्नाव : निष्काळजी केल्याने पोलिस निरीक्षकासह 7 पोलिस तडकाफडकी निलंबीत

उन्नाव : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील उन्नाव बलात्कार प्रकरणात प्रशासनाने पोलिस ठाणेदारासह 7 पोलिसांना निलंबित केले आहे. कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी आणि पीडितेच्या कुटुंबीयांना चांगली वागणूक न दिल्यामुळे या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिल्याशिवाय पीडितेवर अत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला होता. उन्नाव पीडितेच्या कुटुंबियांना दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडितेवर आज अत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन द्यावं, अशी मागणी पीडितेच्या बहिणीने केली होती.

यांच्यावर निलंबनाची कारवाई –

बिहार पोलीस स्टेशन प्रभारी अजय त्रिपाठी, अरविंद सिंह रघुवंशी, अब्दुल वसीम ,श्रीराम तिवारी, पंकज यादव, मनोज आणि संदीप कुमार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

उन्नाव जिल्ह्यातील बिहार पोलिस स्टेशन परिसरातील एका खेड्यातील रहिवासी असलेल्या बलात्कार पीडितेला गुरुवारी पहाटे पाच जणांनी रेल्वे स्थानकात जाताना जाळले. शुक्रवारी रात्री 11.40 वाजता दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. तिला गुरुवारी लखनौ येथून हवाई रुग्णवाहिकेतून उपचारासाठी दिल्लीत आणले होते. पीडित मुलीने दोन आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

Visit : Policenama.com