उन्नाव रेप केस संबंधित सर्व प्रकरणाची सुनावणी UPच्या बाहेर, SC चा CBI ला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या गाडीला झालेल्या अपघाताची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण राज्याबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे या प्रकरणाची सुनावणी उत्तरप्रदेशच्या बाहेर होणार आहे. आज या प्रकरणाची सुनावणी करताना मुख्य न्यायाधीशांनी हे प्रकरण बाहेर राज्यात हलविण्याचा निर्णय घेतला असून यापुढे या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी लखनऊला गेल्यामुळे सीबीआयचा एकदेखील अधिकारी आज सुप्रीम कोर्टात हजर नव्हता. त्यावर मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती देण्यासाठी आता एकतरी सीबीआयचा आधिकारी कोर्टात हवा असे आदेश दिले. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सीबीआयला या प्रकरणात अपघाताबरोबरच बलात्काराची देखील माहिती मागवली आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व तपासाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघातात पीडितेच्या काकूचा आणि मावशीचा मृत्यू

रविवारी दुपारी पीडिता प्रवास करत असलेल्या कारला झालेल्या अपघातात पीडितेच्या मावशीचा आणि काकूचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात नसून खून केला असल्याचे आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी या आमदारावर केले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपी आमदार, ट्रक ड्रायवर, क्लिनर आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर साथीदारांची देखील चौकशी सुरु केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –