सेंगर केस : बलात्कार पीडितेच्या वडिलांवर उपचार करणार्‍या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, सर्वत्र प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव रेप केस पीडितेच्या वडिलांवर उपचार करणारे डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, रेप पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आणले होते, तेव्हा डॉक्टर प्रशांत उपाध्याय हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये होते आणि त्यांनी पीडितेच्या वडिलांना तुरुंगात पाठवले होते.

डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते
या प्रकरणाचा वाद झाल्यानंतर जेव्हा सीबीआयने या प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांना निलंबित करण्यात आले होते आणि बर्‍याच दिवसानंतर त्यांना पुन्हा कामावर ठेवण्यात आले होते. यावेळी, डॉक्टर प्रशांत उपाध्याय हे फतेहपूर येथे तैनात होते. मात्र सोमवारी डॉ. प्रशांत उपाध्याय यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. उद्या या प्रकरणासंदर्भातील खटल्याची सुनावणी तिस हजारी कोर्टात होणार आहे. अहवालानुसार डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांना मधुमेहाचा त्रास होता असे स्पष्ट हेत आहे.

जखमी वकिलाचा अहवाल AIIMS मध्ये सादर
याअगोदर गेल्या आठवड्यात माजी आमदार कुलदीप सेंगर यांच्याविरूद्ध उन्नाव बलात्कार प्रकरणात ट्रकच्या धडकेत जखमी झालेले वकील महेंद्रसिंगचा यांचा आरोग्य अहवाल एम्सने सुप्रीम कोर्टात दाखल केला होता. महेंद्र सिंग यांच्या आरोग्य रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की महेंद्रसिंग यांचा उपचार पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांना जास्त उपचार घेणाची गरज नसून त्यांच्या कुटुंबाला सांगण्यात आले आहे की ते जर त्यांना दुसरीकडे कुठे उपचारासाठी घेऊन जायचे असेल तर ते घेऊन जाऊ शकतात.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना दिल्ली उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या कोर्टाने गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने सेंगरवर २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. यापैकी पीडित मुलीला १० लाख रुपये व फिर्यादीला १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/