उन्‍नाव रेप केस : ७ दिवसात ‘तपास’, ४५ दिवसांमध्ये ‘निकाल’, SC चा ‘सुप्रीम’ न्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कडक आदेश दिले असून या प्रकरणाचा तपास ७ दिवसांच्या आत करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मुख्य न्यायाधीश रंजन गाेगाेई यांच्या खंडपीठाने या प्रकरणात ७ दिवसांत तपास करून पुढील ४५ दिवसांत या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणी ३ वेळा सुनावणी झाली असून या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिलेले आदेश

१) उन्नाव बलात्कार प्रकरणात दाखल असलेले ५ गुन्हे लखनऊ मधून दिल्लीत ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

२) पीडितेच्या गाडीच्या अपघात प्रकरणाचा तपास ७ दिवसांच्या आत पूर्ण करणे.

३) पीडितेच्या परिवाराला सीआरपीएफ ची सुरक्षा व्यवस्था त्याचबरोबर वकील देखील देण्याचे आदेश.

४) पीडितेला २५ लाख रुपये देण्याचे उत्तर प्रदेश सरकारला आदेश.

५)पीडितेवर लाखनऊ मध्ये योग्य उपचार होत नसल्यास दिल्लीतील एम्समध्ये हलविण्यात यावे.

६) या खटल्याची सुनावणी ४५ दिवसांच्या आत पूर्ण करणार.

७) पीडितेच्या काकाला तुरुंगातून हलवायचे असल्यास परवानगी मागणे.

८) पीडितेला कोणतीही अडचण किंवा त्रास असल्यास सरळ सुप्रीम कोर्टात तक्रार करावी.

पीडितेच्या आईच्या चिट्टीवर गंभीर

या सुनावणीबरोबरच मुख्य न्यायाधीश रंजन गाेगोई यांनी पीडितेच्या आईने लिहिलेल्या चिट्टीविषयी देखील गांभीर्य दाखवले असून या प्रकरणी त्यांनी तपासाचे आदेश दिले असून हि चिट्टी मुख्य न्यायाधीशांपर्यंत पोहोचू शकली नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –