उन्नाव बलात्कार केस : दोषी कुलदीप सेंगरनं जन्मठेपेच्या शिक्षेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात दिले ‘आव्हान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव गँगरेप प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेला माजी आमदार कुलदीपसिंग सेंगर याने तीस हजारी कोर्टाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सेंगर याला तीस हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबासाठी पंचवीस लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देखील दिले आहेत. न्यायालयाने आमदार कुलदीपसिंग सेंगर याला अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आहे.

कलम ३७६ आणि पोक्सोच्या कलम ६ नुसार दोषी
या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने चर्चेदरम्यान कोर्टाकडे जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली होती. १६ डिसेंबर रोजी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सेंगरला कलम ३७६ आणि पोक्सोच्या कलम ६ अंतर्गत दोषी ठरवले होते. तर १७ डिसेंबर रोजी शिक्षेवर चर्चा करण्यात आली होती. यापूर्वी कोर्टाने म्हटले होते की या प्रकरणात आपल्याला कोणताही निर्णय घाईघाईने द्यायचा नाही, कारण उन्नाव बलात्कार प्रकरण हे भयंकर कट, हत्या आणि अपघातांनी परिपूर्ण असे प्रकरण आहे.

पीडितेच्या वडिलांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरचा झाला मृत्यू
नुकताच पीडितेच्या वडिलांचा उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. जेव्हा पीडितेच्या वडिलांना मारहाण करण्यात आली होती त्यावेळी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले तेव्हा डॉ. प्रशांत उपाध्याय हे इमर्जन्सीमध्ये असल्याने त्यांनीच पीडितेच्या वडिलांवर उपचार केला.  त्यांनीच पीडितेच्या वडिलांना जेलमध्ये पाठविले होते. त्यानंतर जेव्हा सीबीआयने प्रकरणाची चौकशी केली तेव्हा डॉ. प्रशांत यांना सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर त्यांना नोकरीवर घेण्यात आले. यावेळी ते फतेहपूर येथे नोकरीवर होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/