उन्नाव अपघातात भाजपा आमदाराचा हात ? ; पोलिस म्हणतात, ‘कॉल डिटेल्स’ तपासण्याचं काम सुरु

उन्नाव : वृत्तसंस्था – उन्नाव रेप केस प्रकरणातील पीडित मुलीच्या कार अपघातानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (सोमवार) पहिल्यांदा आपली प्रतिक्रीया दिली आहे. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी फॉरेन्सिकचे पथक पाठवण्यात आले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या सर्वांचा उपचाराचा खर्च प्रशासन करणार असल्याचे लखनऊ परिक्षेत्राचे अतिरीक्त पोलीस महानिरीक्षक राजीव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ट्रक चालकांनी आधी कोणाशी संपर्क साधला आहे याचा तपास करण्यात येत आहे. ट्रक चालक, क्लीनर आणि मालक यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहेत. तसेच कुलदीप सिंह याच्या संपर्कात असणाऱ्या लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येत असल्याचे अतिरीक्त पोलीस महानिरीक्षक राजीव कृष्णा यांनी सांगितले.

कसा आणि कधी झाला अपघात ?
अतिरीक्त पोलीस महानिरीक्षक राजीव कृष्णा यांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.२८) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक आणि कारची समोरा-समोर धडक झाली. स्विफ्ट कार रायबरेलीच्या दिशेने जात होती तर ट्रक रायबरेलीवरून फतेहपूरच्या दिशेने जात होता. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या उपचाराचा सगळा खर्च प्रसासन करणार आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या एकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून दुसऱ्याचा अहवाल येणे बाकी आहे. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या महेश सिंह याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महेश याला सीबीआयच्या स्वाधीन करण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणाचा आम्ही तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे राजीव कृष्णा यांनी सांगितले.

ट्रक चालकाकाडे केलेल्या चौकशीत ट्रक चालकाने सांगितले की, घटना घडली त्यावेळी जोरत पाऊस पडत होता. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक जप्त करण्यात आला आहे. ट्रकच्या नंबर प्लेटवर रंग लावण्यात आला आहे. याचा तपास केला असता ट्रक मालकाने हा ट्रक फायनान्स कंपनीकडून खरेदी केला आहे. फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने त्याने नंबर प्लेटवर रंग लावला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असल्याचे अतिरीक्त पोलीस महानिरीक्षक राजीव कृष्णा यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –