उन्नाव रेप केस : फॉरेन्सिक रिपोर्टनंतर CBI तपासाची मागणी करणार

उन्नाव : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील भाजप आमदार कुलदिपसिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेचा रविवारी (दि.२८) अपघात झाला आहे. या अपघातात पीडित तरुणीची काकू आणि वकील यांचा जागीच मृत्यू झाला तर पीडित तरुणीवर लखनऊ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची फॉरेन्सिक चौकशी करण्यात येत असून याचा अहवाल आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे पोलीस महानिरिक्षकांनी सांगितले.

या घटनेनंतर पीडित तरुणीच्या बहिणीने या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्या लोकांनीच हा अपघात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या प्रकरणी लखनऊचे पोलीस महानिरीक्षक राजीव कृष्णा यांनी सांगितले की, या प्रकरणाची फॉरेन्सिक चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल. तसेच हा अपघात समोरा-समोर झाला असून या प्रकरणी ट्रक चालक आणि ट्रक मालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?
कुलदीप सिंह सेंगर आणि त्याचा भाऊ अतुल सिंह याच्यावर गावात राहणाऱ्या एका मुलीने सामुहिक बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणात कुलदीप सेंगर आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून कुलदीप सेंगर सध्या जेलमध्ये आहे. सामुहिक बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीच्या कुटुंबाचे आणि सेंगर यांच्यात मैत्रीचे संबंध होते. दोघांची घरे जवळ-जवळ असल्याने त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते.

दरम्यान, ४ जून २०१७ मध्ये आमदार कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ आणि इतर साथीदारांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. कुलदीपवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यामध्ये ८ महिने वाद झाले. आरोपींनी पीडित तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर याबाबत बाहेर वाच्चता केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर एक आठवड्यांनी पीडित तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची विक्री करण्यात आली. यातून सुटल्यानंतर तिला दिल्ली येथील तिच्या काकांच्या घरी पाठवण्यात आले.

पीडित तरुणीने तिच्या बाबतीत घडलेली सर्व हकिकत काकूला सांगितली. त्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर सीबीआयने कुलदीप सेंगरला अटक केली. दरम्यान, पीडित तरुणीच्या वडिलांचा तुरुंगात मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूला सेंगर जबाबदार असल्याचा आरोप कुलदीप याच्यावर लावण्यात आला. तर पीडित तरुणीच्या काकाला दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये जेल झाली आहे. त्याला भेटण्यासाठी पीडित तरुणी जेलमध्ये जात होती.

आरोग्यविषयक वृत्त –