उन्नाव बलात्कार केस : पिडिताची मृत्युशी झुंज अखेर अपयशी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – उन्नाव बलात्कार पिडितीची जीवनाची झुंज शुक्रवारी रात्री सफदरजंग हॉस्पिटलमध्ये संपली. बलात्कार प्रकरणातील खटल्यासाठी जात असताना तिला पेटवून देण्यात आले होते. या घटनेत ही पिडिता ९० टक्के भाजली होती.

उन्नाव बलात्कार खटल्यासाठी ती रायबरेली येथे जाण्यासाठी पहाटेच्यावेळी रेल्वेने निघाली असता जामिनावर सुटलेल्या आरोपींनी तिला वाटेत गाठून पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर तिला प्रथम लखनौ व तेथून एअर अम्ब्युलन्य द्वारे दिल्लीतील सफतरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्यावेळी तिची प्रकृती नाजूक होती.

गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत ती शुद्धीवर होती. शुद्धीवर असताना तिने आपल्याला बहिणीला आपल्याला पेटवून देणाऱ्यांना सोडू नका असे सांगितले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी तिला व्हेटिलेटरवर ठेवले. मात्र, त्यातून ती पुन्हा शुद्धीवर येऊ शकली नाही. शुक्रवारी रात्री तिने अखेरचा श्वास घेतला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like