उन्नाव रेप केस : आमदार कुलदीप सेंगर अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी ‘दोषी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आज या प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सेंगर याला पीडितेच्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून अन्य आरोपींना देखील दोषी ठरविण्यात आले आहे. अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी पडितेच्या वडिलांना या प्रकरणात अडकवल्या बद्दल कोर्टाने त्याला दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कारागृहातच हत्या करण्यात आली होती. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने उन्नाव बलात्कार तसेच पीडितेच्या गाडीच्या अपघात प्रकरणाचा तपास नुकताच सीबीआयकडे सोपवला होता. त्यानंतर आता न्यायालयाच्या या निर्णयाने आरोपी कुलदीप सेंगर याला मोठा झटका बसला आहे. याआधी त्याच्यावर पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

अपघातात पीडितेच्या काकूचा आणि मावशीचा मृत्यू
रविवारी दुपारी पीडिता प्रवास करत असलेल्या कारला झालेल्या अपघातात पीडितेच्या मावशीचा आणि काकूचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा अपघात नसून खून केला असल्याचे आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी या आमदारावर केले होते. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील आरोपी आमदार, ट्रक ड्रायवर, क्लिनर आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर साथीदारांची देखील चौकशी सुरु केली आहे. आमदार कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ मनोज सेंगर आणि अन्य आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like