ट्रक-व्हॅनची धडक ; अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

उन्नाव : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रक आणि व्हॅनच्या भीषण धडकेत सात जणांचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनांमध्ये धडक झाल्यानंतर व्हॅनने पेट घेतला. यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात आग्रा-लखनऊ महामार्गावरील टोल नाक्यासमोर झाला. पोलिसांनी सात लोकांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हॅनची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर व्हॅनने पेट घेतला. व्हॅनमध्ये बसलेल्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहीती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून व्हॅनला लागलेली आग विझवली.

पोलिसांच्या माहितीनुसार, व्हॅन ही विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत होती. व्हॅनचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकला व्हॅनची धडक बसली. ही धडक एवढी मोठी होती की, व्हॅनने पेट घेतला. त्यामुळे व्हॅनमध्ये बसलेल्या सात जणाचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे हरदोई-उन्नाव महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

You might also like