उन्नाव पिडीतेच्या मृत्यूमुळं दुखी झालेल्या महिलेनं आपल्याच 6 वर्षाच्या मुलीवर पेट्रोल फेकलं, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नावमध्ये बलात्कार झालेल्या पीडितेच्या मृत्यूमुळे सर्व देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिवारी उन्नाव येथे झालेल्या घटनेमुळे व्यथित होऊन एका महिलेने स्वतःच्या मुलीवर पेट्रोल टाकले. मुलीला तात्काळ आपत्कालीन कक्षात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरु आहे.

पोस्टमाॅर्टम नंतर मृतदेह उन्नावला रवाना
जीवन आणि मृत्यूशी मोठा संघर्ष केल्यानंतर अखेर उन्नावमधील पीडितेने शुक्रवारी रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आपला अखेरचा श्वास घेतला. शनिवारी येथे पोस्टमॉर्टम करण्यात आला, त्याला एक तास लागला. यावेळी संपूर्ण पोस्टमॉर्टम प्रक्रियेचे व्हिडीओग्राफीही करण्यात आली. यानंतर मृत महिलेचा मृतदेह येथून उत्तर प्रदेशातील तिच्या मूळ ठिकाणी उन्नाव येथे पाठविला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह रस्त्याने उन्नाव येथे नेण्यात येत आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like