धक्कादायक ! आळंदीतील विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आळंदी येथील एका संस्थेत आध्यात्म शिक्षण घेण्यासाठी आलेल्या एका १५ वर्षाच्या विद्यार्थ्यावर तेथील कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

लहू अर्जुन गायकवाड (वय २९) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, खेड तालुक्यातील केळगाव येथे असलेल्या एका अध्यात्मिक शिक्षण संस्थेत हा प्रकार १ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला. लहु गायकवाड याने संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या १५ वर्षाच्या मुलाला उठवून पहिल्या मजल्यावर नेले व तेथे त्यांच्यावर अनैसर्गिक संभोग केला. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहे.