सांगवीत सावत्र बापाकडून अनैसर्गिक कृत्य

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

आई घरात नसताना सहा वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधम सावत्र बापाविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर निगडी येथे पाणीपुरी खात असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.

[amazon_link asins=’B0748NPV86,B0757K3MSX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01f69c60-a763-11e8-b2f5-05e21d5278e5′]

या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. तर तळभंडारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार मे ते जून या दोन महिन्यात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलाची आई कामानिमित्त बाहेर जाते. यवेळेत तो मुलगा सावत्र बापासोबत असायचा. यादरम्यान तो नराधम हा त्या मुलासोबत अनेसर्गिक कृत्य करत होता. तपास सांगवी पोलीस करत आहेत.
निगडी पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. तर रमेश दादाराव जाधव (३०, रा. थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी यमुनानगर येथील एलआयसी बिल्डिंगजवळ पाणी पुरी खात होती. त्यावेळी रमेश हा तिथे बुलेटवर आला आणि तिचा विनयभंग केला. तसेच पूर्वी पाठलाग करुन, तिच्याशी प्रेमाच्या गप्पा मारुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास निगडी पोलीस करत आहेत.