संतापजनक ! पुण्यात 13 वर्षीय मुलावर अफगानी तरुणाकडून अनैसर्गिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलासोबत बेडरुममध्ये हुक्का ओढून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत अफगानी तरुणाने त्याला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित अफगानी तरुणावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहा मिरवाईज (महंमदवाडी मुळ रा. अफगानिस्तान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अफगनी तरुण हा फिर्यादी य़ांच्या सोसायटीत राहण्यास आहे. त्याची फिर्यादीच्या तेरा वर्षीय मुलाशी चांगली मैत्री जमली आहे. मागील चार महिन्यापासून त्यांची चांगली मैत्री आहे. २ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांचा मुलगा त्याच्या फ्लॅटवर खेळण्यासाठी गेला. त्यावेळी दोघांनी त्याच्या बेडरुममध्ये बसून हुक्का ओढला . त्यानंतर त्याने पिडीत मुलाचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यामुळे तो ओरडू लागला. मात्र त्याने ओरडण्यास सुरुवात केल्यावर तू बैठ जा , नही तो मै तुझे मारूंगा असे धमकावले. हा प्रकार पिडीत मुलाने घरी येऊन सांगितल्यानंतर पिडीताच्या कुटुंबियांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.