धक्कादायक ! अनैसर्गिक संबंधांसाठी मित्राकडून जबरदस्ती; मित्राचा निर्घृण खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाची राजधानी दिल्लीत एका तरुणाने आपल्या मित्राची हत्या केली आहे. या हत्येमागचे कारण जेव्हा समोर आले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो तरूण आपल्या मित्रावर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. त्यामुळे या सगळ्याला वैतागून मित्राने त्याची हत्या केली. मृत तरुणाचे नाव भरत असून तो त्रिलोकपुरी येथे राहात होता. तर त्याच्या मारेकराचे नाव मोनू असे आहे. हि घटना दिल्लीच्या मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मोनू याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुण आणि आरोपी मोनू हे दोघेही मित्र होते.

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत असताना त्यांना त्रिलोकपुरी परिसरात एक तरुण त्यांच्या नजरेस पडला. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. पोलिसांना त्याचा संशय येताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने आपला मित्र भरत याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भरतचा मृतदेह ताब्यात घेतला. अशी माहिती डीसीपी दीपक यादव यांनी दिली आहे.

आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोनू हा अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होता त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरूनही वाद होता अशी माहिती देखील मिळाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अशी माहिती डीसीपी दीपक यादव यांनी दिली आहे.