कलम ३७० ! पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राकडून मोठा ‘दणका’, ‘या’ कराराची करून दिली आठवण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. परंतू याच कुरापती पाकिस्तानला आता आणखी एक झटका बसला आहे. संयुक्त राष्ट्रचे प्रमुख एंतोनियो गुतारेस यांनी भारताला आणि पाकिस्तानला संयम बाळगण्यास सांगितले आहे आणि शिमला कराराची आठवण करुन देत या मुद्यावर कोणत्याही तिसऱ्याचा सल्ला नाकाराला आहे. या वक्तव्याला यामुळे महत्व प्राप्त झाले कारण भारताने याच दरम्यान जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले आहे.

पाकिस्तानने या निर्णयाला एकपक्षीय आणि अवैध मानले आहे आणि यासाठी ते संयुक्त राष्ट्राकडे जाणार असल्याचे सांगितले. परंतू आता गुतारेसचे प्रवक्ता स्टीफन यांनी खडसावले की महासचिव जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. महासचिव यांनी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान द्विपक्षीय संबंधावर १९७२ मध्ये झालेल्या कराराची आठवण करुन दिली कि जम्मू काश्मीर संबंधित कोणताही प्रश्न संयुक्त राष्ट्रचे चार्टरनुसार शांततापूर्ण पद्धतीने सोडवण्यात यावा. गुतारेस यांनी सांगितले की दोन्ही देशांनी असे कोणतेही पावले उचलू नका ज्याने जम्मू काश्मीरमधील स्थितीवर परिणाम होईल.

सुरक्षा परिषदेने देखील पाकिस्तानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सुरक्षा परिषदाचे अध्यक्ष जोआन्ना वेरोनिकाने प्रेस काँफरन्सच्या दरम्यान पाकिस्तानच्या चिट्ठीवर उत्तर देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला चिठ्ठी दिली होती. या चिठ्ठी संबंधित सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना प्रश्न विचारला होता मात्र त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला परंतू भारताने ५ ऑगस्टला सुरक्षा परिषदच्या सर्व देशांना ३७० कलम रद्द केल्याची माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त