पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे यांंची बिनविरोध निवड

नीरा पोलिसनामा ऑनलाईन – पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल दिनकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जेजुरी ( ता.पुरंदर ) येथे झालेल्या पुरंदर पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणूकीत ही निवड करण्यात आली. यावेळी तालुका पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

पुणे जिल्हा पत्रकार संलग्न पुरंदर तालुका पत्रकार संघाची रविवारी (दि.१८) द्वैवार्षिक निवडणूक पार पडली. या वेळी कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल भांडवलकर यांनी पदाधिका-यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सतिश सांंगळे यांनी काम पाहिले.
तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे

पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल दिनकर शिंदे ,उपाध्यक्षपदी किशोर तुकाराम कुदळे, सरचिटणीसपदी अमोल अरविंद बनकर , कोषाध्यक्षपदी निलेेेश प्रकाश भुजबळ, जिल्हा प्रतिनिधीपदी राजेंद्र ज्ञानोबा शिंदे, तालुका समन्वयकपदी प्रविण सोपान नवले, सहसरचिटणीस पदी स्वप्निल अशोक गायकवाड, तर कार्यकारिणी सदस्यपदी योगेश साहेबराव कामथे, विशाल हनुमंत फडतरे, निखील सतिश जगताप, चंद्रकांत विष्णू चौंडकर, संतोष आबाजी दुबल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नविन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर, मावळते अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, बी.एम. काळे , बाळासाहेेब ननवरे, हेमंत ताकवले , बाळासाहेब कुलकर्णी, प्रकाश खाडे, प्रकाश फाळके,
यांनी अभिनंदन केले.