पिंपळगांव नजिकच्या सरपंचपदी कल्पना उत्तम वाघ यांची बिनविरोध निवड

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील ग्रामपंचायत सरपंच पद निवडणुक नुकतीच पार पडली यात ग्रामपंचायत सरपंच पदी कल्पना उत्तम वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत मागील सरपंच आवर्तन पध्दतीनुसार राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते.

मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडलेल्या निवडी प्रसंगी लासलगाव मंडळ अधिकारी बच्छाव, नांदूर मध्यमेश्वर मंडळ अधिकारी आहेर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच सौ. कल्पना दादा व्हलगडे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता शिंदे, विलास चव्हाण, जिजाबाई वाघ, कल्पना वाघ, रत्नप्रभा घोडे, जीवन पांगुळ, चारूदत्त आढाव, सौ. भारती महाले उपस्थित होते.

या निवडणुक प्रसंगी पं. स. निफाड उपसभापती शिवा सुरासे यांनी नवनियुक्त सरपंच यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठलराव खुटे, पो. पाटील भरत फड, माजी पं. स. सदस्य उत्तम वाघ, जगन्नाथ खुटे, राजाराम घोडे, संजय महाले, राजेंद्र व्हलगडे, कैलास खुटे, योगेश मोरे, यमुना वाघ, सुमन वाघ, केदू सोनवणे, शुभम वाघ, निलेश देवरे, नंदा वाघ, मधुकर पगारे, सचिन विंचू, इतर ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कदम, संतोष शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद काशिनाथ खुटे, विवेक माळी, पुंजाराम कदम, प्रविण शिरसाठ, अशोक कापसे, सतीश शेजवळ उपस्थित होते व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगांव पो. स्टेशन चे पो. कॉ. ठोंबरे यांनी बंदोबस्त ठेवला.