महिलेच्या सांगाड्याचे गूढ उकलल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुक्यातील केसनंद -थेऊर रोडवरील विहिरीमध्ये सापडलेल्या महिलेच्या सांगाड्याचा उलगडा झाला असून पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीनेच वर्षभरापूर्वी तिचे हातपाय बांधून गाठोड्यात तिला बांधून दगड बांधून विहिरीमध्ये फेकून दिले होते.

शिलाबाई राजू सुतार (स्वामी) असे सांगाडा सापडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खुन करणारा पती राजू सातप्पा सुतार यास पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली. कॅन्सर झालेल्या पत्नीवर उपचार करणे शक्य नसल्याने त्याने पत्नीचा खुन करुन तिचा मृतदेह विहिरीत टाकून दिला होता. पण, एक वर्षाने का होईना खुनाला वाचा फुटली.

केसनंद गावच्या हद्दीत राजेंद्र जाधव यांच्या शेतजमीनीत असणाऱ्या विहिरीत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील हाडांचा सांगाडा मंगळवारी (दि.१८) आढळला होता. सांगाड्या सोबत मिळालेले कपडे व दागिन्यांच्या सहाय्याने तपास करण्याचे आवाहन लोणीकंद पोलिसांसमोर होते.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षापुर्वी मिस्त्री काम करणारे राजू सुतार पत्नीसह केसनंद-तळेरानवाडी येथील बाळासाहेब वाळके यांच्या खोलीत राहत होते. त्यावेळी सुतार यांची सतत आजारी असणारी पत्नी अचानक गायब झाली होती. तर एक आठवड्यानंतर राजू सुतार देखील सर्व सामान घरात सोडून गावी पसार झाले असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची शंका बळावल्याने सुतार याच्या गावाचा शोध घेत पोलीस सोलापूर येथे पोहोचले. दक्षिण सोलापूर येथील कुंभारी गावातून त्यास ताब्यात घेतले.

पत्नी शिलाबाई दोन वर्षापासून कॅन्सर आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर उपचार करणे शक्य होत नसल्याने आजारपणाच्या खर्चाला कंटाळून तिला गाठोड्यात दोरीने बांधून त्याला दगड बांधून जवळच असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून हत्या केल्याची कबुली राजू सुतार याने पोलिसांना दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पांढरे केस काळे करा, मध आणि लसूण आहे रामबाण औषध

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी
सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत