भाजपमध्ये बंडखोरीची लागण, या दिग्गज मंत्र्याची डोकेदुखी वाढणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपामध्ये माेठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. मात्र, भाजपला आता दुसरीच डोकेदुखी सतावत आहे. भाजपला बंडखोरीची लागण झाली असून कर्जत जामखेड मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री राम शिंदे यांचे खंदे समर्थक असणारे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जतमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने राम शिंदे यांची डोकेदुखी वाढणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

नामदेव राऊत यांच्या रॅलीला आणि मेळाव्याला समर्थकांनी प्रतिसाद दिला आहे. रॅली नंतर मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी राऊत यांनी निवडणूकीला उभा राहण्याचा आग्रह केला आहे. तर राऊत यांनी आपल्या भाषणात राम शिंदे यांच्यवर आरोप करत त्यांना मदतीची जाणीव नसल्याचे म्हटले आहे. येत्या आठ दिवसात आपण निवडणूक लढवण्यासंबंधीचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्जत तालुक्यामध्ये राऊत यांचा मोठा जनसंपर्क आहे. मागील निवडणुकीत राम शिंदे यांना मदत केल्यामुळे शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांचे आव्हान राम शिंदे यांच्यासमोर आहे. त्यातच नामदेव राऊत यांनी निवडणुक लढण्याचे जाहीर केल्याने राम शिंदे यांच्या समोर अडचणी वाढल्या आहेत.

Loading...
You might also like