UNSC मध्ये कश्मीरच्या मुद्द्यावर ‘जिंकला’ भारत, आता ‘या’ मुद्यावर लक्ष देण्याची गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीनदेखील तोंडघशी पडला.
UNSC मध्ये झालेल्या या बैठकीत पाकिस्तान आणि चीनने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील काश्मीरविषयी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला.

मात्र त्यानंतर देखील भारताच्या अडचणी कमी झाल्या नसून या बैठकीत अमेरिका आणि फ्रान्सने भारताची बाजू घेत हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते. याआधी देखील रशियाने हा भारत आणि पाकिस्तानमधील अंतर्गत वाद असून तो दोन्ही देशांनीच सोडवायला हवा, असे म्हटले होते. त्यामुळे चीनचा मोठ्या प्रमाणात तिळपापड झाला होता. या परिषदेत सर्व देश भारताच्या बाजूने उभे राहिले असले तर भारतासमोरील अडचणी कमी झाल्या नसून भारत यापुढे काय भूमिका घेतो हे सर्व त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे.

राजकीय विश्लेषकांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे कि,पोखरणच्या दुसऱ्या यशस्वी चाचणीनंतर भारताला पहिल्यांदा अशा प्रकारे कूटनीतीच्या राजकारणात यश मिळाले आहे. भारत १९९८ च्या तुलनेत यावेळी जास्त शक्तिशाली दिसून येत आहे. नागरी स्वतंत्रता आणि सर्वांना योग्य प्रमाणात मानवाधिकार मिळवून देणे हे भारतासमोर सर्वात मोठी समस्या आहे. विदेशातील पत्रकार त्याचप्रमाणे पाकिस्तानी स्टेट एजेंट मोदींना निशाणा बनवून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. जर काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडली आणि आणि सैन्याचा वापर करावा लागला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे समर्थन कमी होऊन याचा भारताला मोठा फटका बसू शकतो. त्याचबरोबर सीमेवर देखील कोणत्याही प्रकारचे युद्ध झाल्यास भारताला याचा मोठा फटका बसू शकतो.

हे दोघे आहेत थर्ड अंपायर
काश्मीरच्या मुद्द्यावर चीन आणि अमेरिका हे दोघे सध्या महत्वाची भूमिका पार पाडत असून या दोघांच्या भूमिकेवर भारताची नजर असणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत देखील फ्रांस, अमेरिका आणि अन्य लहान देशांच्या समर्थनामुळे चीनचा विरोध कमी पडला. मात्र भविष्यात चीनच्या भूमिकेकडे भारताला महत्वाच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर भारत सध्या खूप मजबूत स्थितीत असून सध्या संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे आहे. त्यामुळे काश्मीर मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भूतकाळ बनला आहे. त्याचबरोबर काश्मीरची मुख्य समस्या काश्मीर नसून लडाख आहे. केंद्र सरकारने लडाखला केंद्र शासित प्रदेश घोषित केल्यामुळे चीन परेशान झाला आहे. चीन सध्या पाकिस्तान आणि चीनच्या आर्थिक कॉरिडोरच्या मदतीने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तो गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आपले सैन्य देखील ठेऊन भारतावर दबाव टाकू शकतो.

दरम्यान, भारताला घरगुती वाद, आंतरराष्ट्रीय वाद तसेच सीमेवरील प्रश्नाकडे समान लक्ष देण्याची गरज असून यातील कोणत्याही विभागाकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी किंमत चुकवावी लागू शकते.

आरोग्यविषयक वृत्त