मसूदचा आज संयुक्त राष्ट्रात फैसला, चीनच्या भूमिकेवर सर्वांची नजर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला घेरण्यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज (बुधवार) बैठक होत आहे. या बैठकीमध्ये मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायचे की नाही हे निश्चित होणार आहे. यासाठी भारताला अमेरिकेची साथ मिळाली आहे.
भारत आणि अमेरिका सोबत काम करत आहेत.

जैश-ए-मोहम्मदच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. या संघटनेचा म्होरक्या मसूद आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे लागेल. भारतीय उपखंडातील शांतता मसूदमुळे धोक्यात येत आहे. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा प्रस्ताव ठेवला होता. मात्र. प्रत्येक वेळी चीनने आपल्या मताचा वापर करुन तो मंजूर होऊ दिला नाही. यावेळीही चीनने मसूदविरोधात आणखी पुरावे मागितले आहेत. आता पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मसूदविरोधी वातावरण तयार झाले आहे. एवढेच नाही तर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटननेही प्रस्ताव आणला आहे.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रस्ताव ठेवला होता. पण प्रत्येक वेळी चीनने आपल्या मताचा वापर करुन तो मंजूर होऊ दिला नव्हता. यावेळीही चीनने मसूदविरोधात आणखी पुरावे मागितले आहेत. आता पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मसूद अजहरविरोधी वातावरण तयार झालं आहे.

एवढंच नाही तर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटननेही प्रस्ताव आणला आहे. 14 फेब्रुवारी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर भारतीय वायू दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला होता.

ह्याही बातम्या वाचा –

लोकसभेसाठी शिवसेनेची महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?