‘कोरोना’वर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, ‘या’ सरकारनं केली घोषणा

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. लॉकडाउननंतर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न झाले. परंतु, कोरोना वाढता प्रसार पाहून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केली. कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असं ही त्यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात पालक आहेत असंही सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हंटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत पर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती.

सिसोदिया यावेळी म्हणाले, की शाळा सुरु करण्याबाबत आम्ही सतत पालकांच्या संपर्कात आहोत आणि त्यांचे मत जाणून घेत आहोत. शाळा सुरू करण्यासाठी सध्याचे वातावरण योग्य नाही. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या तिथे तिथे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील.

तर काही राज्यांत शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार

राज्यात लॉकडाउननंतर नियमांमध्ये सूट देण्यात आली. परंतु, विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. आता शाळा सुरू करण्याबाबत निर्णय आता संबंधित राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. काही ठिकाणी नियमानुसार शाळा पुन्हा सुरु करण्याची तयारी देखील सुरू केली आहे. तर काही राज्यांनी वाढत्या कोरोनामुळे शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे.