… तर तोपर्यंत वॉईन शॉप अन् बिअर शॉपीचा परवाना रद्द : जिल्हाधिकारी राम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात सशर्त नियम आणि अटीनंतरच वाईनशॉप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन झाल्यास लॉकडाऊन पर्यंत त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम उपस्थित होते.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही प्रमाणात नियम शिथिल केले. तर बाहेर जाणाऱ्यासाठी देखील परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. तसेच वाईनशॉप उघडण्यास देखील परवानगी दिली आहे. मात्र यानंतर शहरात जत्राच भरली आणि रागांच रांगा लागल्या. नियम तर धाब्यावर बसवले गेलेच, पण कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत देखील होऊ लागली. यानंतर पोलिसांनी वाईनशॉपी चालकासाठी नियम बनविले आहेत.

दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी राम यांनी शहरातील वाईनशॉप चालकानी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचा परवाना लॉकडाऊन पर्यंत निलंबित करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच मद्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. तसेच त्यांनी मास्क न लावल्यास मद्य न देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या नागरिका पेक्षा अधिक नागरिक जमा झाल्यास कारवाई करण्यात येईल असे देखील सांगण्यात आले आहे.

पुणे शहरातील 42 प्रभागांपैकी 8 प्रभागात 50 पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तर शहरात 15 वार्ड कार्यालये असून, त्यापैकी 5 कार्यलयांच्या क्षेत्र कोरोना प्रभावित झाले आहेत. या भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

परराज्यातील नागरिकांना जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी काम सुरू केले आहे. माहिती घेण्याचे काम पोलीस ठाणे स्थरावर सुरू आहे. तर 1 हजार 200 किंवा 1 हजार 180 प्रावाशी परराज्यात जाण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडली जाईल असे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. तसेच राज्यात कुठेही जाण्यासाठी परवागी दिली जाईल. मात्र, त्यासाठी ऑऩलाईन अर्ज करवा, त्यानंतर जो प्रवासी ज्या ठिकाणी जाणार आहे. त्याठिकाणच्या प्रशासनाचाी परवागी घेतली जाणार आहे. त्यानंतरच परवानगी दिली आहे.

सध्या दररोज 600 सॅम्पल चाचणी

शहरात सध्या दररोज 600 ते 700 सॅम्पल चाचणी केली जात आहे. ते वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याची संख्या आता दोन हजाराच्या पुढे गेली आहे.