शिक्रापुर परिसरात आढळली बेवारस कार , कार मध्ये रक्ताचे डाग आढळल्याने खळबळ

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण रोड जुना टोलनाक्याजवळ बिगर नंबरची बेवारस कार आढळून आली या कार वर सर्वत्र रक्ताचे डाग आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावत सदर कार या ठिकाणी आणून सोडली असल्याचे बोलले जात आहे.

शिक्रापूर ता शिरूर येथील चाकण रोड रस्त्यालगत जुन्या टोलनाक्याजवळ एक पांढऱ्या रंगाची बिगर नंबरची कार उभी असून असून त्या कारवर रक्ताचे शिंतोडे उडले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांना मिळाली त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस हवालदार दत्तात्रय होले, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, हरीश शितोळे, अमोल दांडगे, किशोर शिवणकर, अमोल रासकर, प्रतीक जगताप, अमोल नलगे, बापूसाहेब हडगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर यांसह आदींनी त्या ठिकाणी जात पाहणी केली असता तेथे एम एच 14 सी एक्स ८०३२ असा खोडलेल्या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार व त्या कार वर सर्वत्र तसेच आतमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचे शिंतोडे उडलेले होते.

पोलिसांनी कारचे दरवाजे उघडे करत तपासणी केली असता कार मध्ये पिंपरी चिंचवड येथील एका बस चालकाचा ब्याच असलेला बिल्ला, तसेच आतील सर्व भागांसह मागील डिक्की मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडलेले होते तसेच पाठीमागील भागात इसमाचे दात पडल्याचे देखील आढळून आले, यावेळी पोलिसांनी सदर प्रकारा बाबत माहिती घेतली असता काही माहिती मिळू शकली नाही, मात्र अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी कोणत्यातरी व्यक्तीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावून कार बेवारसपणे येथे आणून सोडले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली तर सदर कार व तेथील रक्ताची पाहणी केली असता अज्ञात व्यक्तींचा खून झाला असेल असे बोलले जात आहे, तर यावेळी बोलताना सध्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला नोंद करून पुढील तपास केला जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले