Unwanted Pregnancy | गर्भनिरोधक गोळी घेण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सेक्स नंतर लवकर गर्भनिरोधक गोळी (Contraceptive Pill) घेतल्यास त्याचा योग्य परिणाम होतो. परंतु, ती वेळ माहिती असायला असणे आवशयक आहे. सेक्स करताना गर्भधारणेची (Unwanted Pregnancy) भीती वाटते तर, त्याचा अधिक तणाव घेऊ नका. कारण गर्भनिरोधक गोळीचा योग्य रीतीने वापरण्यात आल्यास गर्भधारणा (Unwanted Pregnancy) टाळता येऊ शकणार आहे. तसेच या गोळ्याचा अधिक वापर केल्यास अथवा रोज वापर केल्यास याचा इफेक्ट् आरोग्यावर होतो.

दरम्यान, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये लेवोनॉर्गेस्‍ट्रेल (Levonorgestrel) नावाचं हार्मोन वापरलेलं असतं. अर्थात ‘मॉर्निंग आफ्टर’ पिल (Morning After Pill) असं त्याला म्हणतात. गर्भधारणा (Pregnancy) टाळण्यासाठी महिला या गोळ्या खातात. यामुळे सेक्सनंतर (Sex) गर्भधारणेची भीती राहत नाही. परंतु या गोळ्या घेण्याची योग्य पद्धत वापरणे आवश्यक आहे. अधिक गोळ्या घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होतात.

गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम आणि वापराची पद्धत –
या गोळ्या आपल्या मासिक पाळीच्या सायकलवर काम करत असतात. या गोळ्या ओव्युलेशन थांबवतात अथवा पुढे नेऊ शकता. म्हणून गर्भधारणा (Pregnancy) रोखू शकतात. प्रेग्नन्ट महिलांनी (Pregnant women) या गोळ्यांचा वापर करू नये. या गोळ्या घेतल्यानंतर असुरक्षिततेची भावना राहत नाही. असं तज्ज्ञांकडून सांगितलं आहे. तसेच, सेक्सनंतर ही गोळी घेणं गरजेचं असतं. म्हणून गर्भधारणेची (Fear of Pregnancy) भीती नसते. सेक्स झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर ही गोळी घेतल्यास असुरक्षित सेक्सनंतर 24 तासांच्या आत ही गोळी घेणं गरजेचं असतं. मात्र, 24 तासांपेक्षा अधिक काळ झाल्यांनतर गोळी घेतली तर अपेक्षित तसा परिणाम मिळत नाही. एकावेळी एकच गोळी खावी. दरम्यान, या गोळ्या घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.

 

सकाळ नंतर गोळी घेण्याचे काय फायदे?

गर्भनिरोधक (Contraceptive Pill) गोळ्या घेतल्यामुळे महिलांना असुरक्षित लैंगिक संबंधाची भीती राहत नाही. याव्यतिरिक्त गर्भधारणेचे टेन्शन रहात नाही. तर, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एखाद्या मेडिकल मधून या गोळ्या खरेदी करता येतात.

गर्भनिरोधक गोळ्याने नुकसान?
गर्भवती महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नये. गर्भधारणेची (Pregnancy) खात्री नसली मात्र, शक्यता वाटत असेल तरी ही या गोळ्या खाऊ नयेत. सकाळ नंतर गोळी घेतल्यानंतर काही त्रास जाणवत असेल, एलर्जी होत असेल तर, या गोळ्या घेऊ नयेत. या गोळ्यांमुळे एनाफिलॅक्सिस रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते.

गर्भनिरोधक गोळ्याचे दुष्परिणाम –
गर्भनिरोधक गोळ्यांचे फारसे दुष्परिणाम होत नसले.
तरी ही काही जणांना पोटदुखी, डोकेदुखी, थकवा, उलटी होणे असे त्रास जाणवतात.
या गोळ्यांमुळे पिरेड सायकलवर परिणाम होऊ शकतो अथवा चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो तर छातीत वेदना देखील होऊ शकतात.

Web Title :- Unwanted Pregnancy | this is the right way to take the birth control pill to prevent unwanted pregnancy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 294 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | 531 गुंतवणुकदारांची 17 कोटीची फसवणूक ! गुडवीन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकाचा जामीन अर्ज फेटाळला

WhatsApp चं नवं फीचर ! यूजर्सला नवीन मेसेज मिळाल्यानंतर सुद्धा Archived Chats कडून मिळणार नाही नोटिफिकेशन