Uorfi Javed | प्रसिद्ध हॉकीपटूने कमेंट केल्याने संतापली उर्फी जावेद; मेसेजचा स्क्रीनशॉट केला शेअर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uorfi Javed | प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. बिग बॉस ओटीटी मधून तिला प्रसिद्धी मिळाली होती. नुकताच उर्फी जावेदला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातम्या समोर आली होती. यावर भाष्य करत उर्फीने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. तर आता उर्फीवर एका हॉकीपटूने कमेंट केल्यामुळे तो अडचणीत आला आहे. कारण उर्फीने त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत त्याला खडेबोल सुनावले आहे. (Uorfi Javed)

 

नुकताच उर्फी ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, “संपूर्ण देश मला तुरुंगात पाहू इच्छित आहे” हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूपच वायरल झाला होता. याच व्हिडिओवर हॉकीपटू युवराज ने कमेंट करत म्हटले की “धन्यवाद दुबई प्लीज तिला नेहमीच तिथेच ठेवा मी तुमचा ऋणी राहील” त्या कमेंट वर उर्फी ने त्याला रिप्लाय देत म्हणाली, “युवराज जर तुला माझ्या कपड्यांचा एवढाच त्रास होत असेल तरीही तू मला मेसेज करतोस”. यापुढे बोलताना उर्फी म्हणाली “अरे माझ्याकडे तू मला आणि बाकीच्या 99999 मुलींना पाठवलेला मेसेजचा स्क्रीनशॉट ही आहे”. (Uorfi Javed)

 

उर्फीच्या कमेंट वर रिप्लाय करत युवराज म्हणाला, “हे खरं नाहीये जर हे खरंच असतं तर तिने त्याचेही स्क्रीन शॉट शेअर करावे. बॉलीवूडमध्ये माझे अनेक मित्र आहे जे मला वारंवार सांगत असतात की तिला उत्तर देऊ नकोस आणि मी तिच्या कपड्यांवर कमेंट केलेले मेसेज तिने मला दाखवावे. मी एका इंस्टाग्रामच्या पोस्टवर कमेंट केली होती मी कोणावरी कमेंट करत नाही. पण समोरच्या व्यक्तीला कधी आणि कसे कपडे घालायला हवे हे कळायला पाहिजे. अभिनेत्री दीपिका पादुकोण बिकनी मध्ये पत्रकार परिषद घेणार नाही”. यानंतर उर्फीने पुन्हा एक स्क्रीनशॉट शेअर करत युवराज ने ती लोकप्रिय नसताना केलेले मेसेज तिने शेअर केले आहे.

 

Web Title :- Uorfi Javed | hockey player yuvraj commented on uorfi javed actress shared screenshots see details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेबांनी इतरांना आधार दिला आता त्यांच्याच मुलाला आणि नातवाला…’; शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र