Uorfi Javed | पुन्हा एकदा उर्फी जावेदची पोस्ट चर्चेत; “फायनली मी माझ्या आजोबांना…..”
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Uorfi Javed | सध्या उर्फी जावेद विविध कारणामुळे चर्चेत आहे. तिच्यामुळे न्युडिटी पसरत असल्याबद्दल तिच्यावर तक्रार दाखल करून अटकेची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. यानंतर या दोघांमधील वॉर सोशल मीडियावर पाहायला मिळाले. सध्या हे वॉर असेच चालू असल्याचेही दिसत आहे. यावेळी काहींनी उर्फीची बाजू घेतली तर काहींनी चित्रा वाघ यांची बाजू घेत उर्फीवर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा उर्फी चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण तिचे चित्र विचित्र ड्रेस नसून एक वेगळीच गोष्ट आहे. (Uorfi Javed)
उर्फी एका फॅशन शो निमित्त दिल्लीत दाखल झाली होती. यावेळी तिने लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत एक फोटोही क्लिक केला. उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर हा फोटो शेअर करत नेहमीप्रमाणे एक हटके कॅप्शन दिले आहे. सध्या तिने शेअर केलेल्या या फोटो पेक्षा नेटकऱ्यांना तिचे कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. तर काहींनी तिच्या कॅप्शनवरून तिची खिल्ली देखील उडवली आहे. उर्फीने जावेद अख्तर सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये म्हटले आहे की “फायनली मी माझ्या आजोबांना भेटले”. सध्या उर्फीची ही पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Uorfi Javed)
Finally I met my grandfather 😛@Javedakhtarjadu pic.twitter.com/diij2RPfGX
— Uorfi (@uorfi_) January 8, 2023
उर्फी जावेदला नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल केले जाते. सुरुवातीच्या काळात तिला जावेद अख्तर यांची नात असल्याचे बोलले जात होते. यावर तिने अनेकदा नकारही दिला होता. त्यामुळे तिने या फोटोला असे गमतीशीर कॅप्शन दिल्याचे बोलले जात आहे. सध्या उर्फीने राजकारणांवर निशाणा साधत “राजकारण्यांना काही काम नाही का?” असा सवाल उपस्थित करत व्हिडिओ शेअर केला आहे. तर पुन्हा एकदा उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Web Title :- Uorfi Javed | urfi javed shared photo with javed akhtar says finally met my grandfather
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold-Silver Rate Today | कोरोना काळातील उच्चांकी दराजवळ पोहोचले सोने, जाणून घ्या आजचे दर
Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्नाच्या निखळ सौंदर्याने चाहते थक्क; फोटोवर कौतुकांचा वर्षाव