UP : संतापजनक ! 13 वर्षांच्या दलित मुलीवर गँगरेप, डोळे फोडल्यानंतर जीभ कापली आणि केली हत्या

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरीमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी आणि माणूसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. येथे एका 13 वर्षीय दलित मुलीवर नराधम केवळ गँगरेप करून थांबले नाहीत तर, नंतर तिचे डोळे फोडण्यात आले. तिची जीभ कापली गेली आणि तिच्या गळ्यात फास टाकून शेतात तिला फरफटत नेले. ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहाणारी ही अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर तर पडली पण परतू शकली नाही.

रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. नंतर पोलीसांना सुद्धा मुलगी गायब झाल्याची माहिती देण्यात आली. अखेर उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवला. अहवालात गँगरेप झाल्याचे स्पष्ट झाले आहे, ज्यानंतर पोलिसांनी दोन नराधमांना हत्येच्या आरोपात अटक केली आहे.

असे घडले प्रकरण
लखीमपुर खीरी जिल्ह्यात ईसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पकरिया गावात राहाणारी 13 वर्षांची निष्पाप मुलगी घरातून शौचासाठी शेतात गेली होती. तेव्हा गावातच राहणार्‍या दोन तरूणांनी या अल्पवयीन मुलीवर रेप केला आणि तिची निर्घृण हत्या केली. मृत्यूपूर्वी या निष्पाप बालिकेचे नराधमांनी हालहाल केले. असह्य वेदनांनी ती आक्रोश करत होती. नरधामांनी तिच्या बलात्कार केल्यानंतर तिचे डोळे फोडले. नंतर तिची जीभ कापली आणि गळ्यात फास टाकून तिला ओढत नेले. नंतर आरोपी मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाले.

13 वर्षांची ही निष्पाप मुलगी 14 ऑगस्टला दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास आपल्या घरातून शौचासाठी उसाच्या शेताकडे गेली होती, परंतु रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. पोलिसांना सुद्धा या घटनेची खबर दिली. कुटुंबिय, पोलिसांच्या टीमसोबत शोध घेत शेताकडे गेले असता उसाच्या शेतात निष्पाप मुलीचा मृतदेह आढळून आला.

गावातील दोन तरूणांना अटक
कुटुंबाने गावातच राहणार्‍या संतोष यादव आणि संजय गौतम यांच्यावर मुलीवर रेप आणि हत्या केल्याचा आरोप केला. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपावरून दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला, आणि मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.

15 ऑगस्टला पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीवर गँगरेप झाल्याचे स्पष्ट झाले. ज्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध हत्या आणि गँगरेपचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली, सोबतच एनएसए अंतर्गत कारवाई सुरू केली आहे.

मायावतींचा योगी सरकारवर हल्ला
बीएसपी प्रमुख मायावती यांनी या घटनेवरून योगी सरकारवर हल्ला केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून लिहिले की, यूपीच्या लखीमपुर खीरीच्या पकरिया गावात दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची नृशंस हत्या अति-दुःखद आणि लाजिरवाणी आहे. अशा घटनांमुळे समाजवादी पार्टी आणि सध्याच्या भाजपा सरकारमध्ये मग कोणते अंतर राहिले? सरकारने आजमगढसह खीरीच्या दोषींविरुद्ध सुद्धा कठोर कारवाई करावी.