UP सरकारचा निर्णय ! कोरोना झालेल्या नोकरदारांना मिळणार 28 दिवसांची पगारी रजा

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश राज्यातील नोकरदार वर्गासाठी एक खास आदेश काढला आहे. तेथील व्यक्तींना कोरोना झाला तर त्यांना २८ दिवसाची पगारी सुट्टी जाहीर केली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे तेथील नोकरदार वर्गाला एक दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने देशात १ मे नंतर १८ वर्षावरील सर्वाना कोरोना लस मिळणार असल्याच जाहीर केल्यानंतर लगेच उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला. तसेचा मुख्यंमत्री योगीनी मोदींचे आभार मानले. यानंतर आता काढलेल्या आदेशात असे नमूद केले की, कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना २८ दिवसांची पगारी रजा संबधित प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. कोरोना काळात ज्या कंपन्या बंद पडल्या आहेत तेथील कर्मचाऱ्यांना सुटीसोबत वेतनभत्ते देण्यात यावे, तर खासगी आणि सरकारी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू करण्यात आला आहे.

युपीमध्ये ज्या दुकानात अथवा कंपनीत १० पेक्षा अधिक व्यक्ती काम करीत आहे, अशा ठिकाणी कोरोनाच्या उपाययोजना मुख्य दरवाज्याजवळ लावण्यास देखील सांगण्यात आले आहे. या दरम्यान, कोरोना  हरेल आणि भारत जिंकेल,’असे टि्वट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ते सध्या गृह विलगीकरणात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मंत्रीमंडळाच्या बैठकीस उपस्थित होते.