योगिताच्या शरीराला जाळायचं होतं आरोपी डॉक्टरला, गोळा केली होती लाकडं

आग्रा : वृत्तसंस्था –  आग्रामधील डॉ. योगिता गौतम खून प्रकरणात बर्‍याच गोष्टी समोर येत आहेत. हत्येतील आरोपी डॉक्टर विवेक तिवारीला हत्येनंतर योगिताचा मृतदेह जाळायचा होता, असे सांगितले जात आहे. या उद्देशानेच त्याने घटनास्थळी लाकडं गोळा केली होती. मात्र अद्याप याची खातरजमा झालेली नाही. आग्रा पोलिसांनी देखील अद्याप अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही.
 
आता प्रश्न उपस्थित होत आहे की, आरोपी डॉक्टर विवेक तिवारीला हत्येनंतर पुरावे मिटवायचे होते, तर तो मृतदेह जाळण्याचा विचार का करेल. एखाद्या वयस्क व्यक्तीचा मृतदेह जाळण्यासाठी सुमारे एक क्विंटल लाकूड आवश्यक आहे. जरी त्याने तिथे मृतदेह जाळला असता, तर तो रंगे हात पकडला जाण्याची भीती अधिक होती. कारण त्या निर्जन ठिकाणी बरीच घरे देखील होती.
 
मात्र ही गोष्ट केवळ एका अफवेसारखी दिसते. कारण पोलिस किंवा संबंधित कोणत्याही व्यक्तीने याबद्दल काहीही सांगितले नाही. डॉ. योगिता गौतम हत्येच्या आरोपात डॉक्टर विवेकला अटक करण्यात आली आहे. डॉ. योगिताच्या पोस्टमार्टम अहवालात तीन गोळ्या लागल्याचे बोलले जात आहे. आरोपी डॉक्टर विवेक तिवारीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
 
योगिताचा मृतदेह आग्रा येथील डौकी पोलिस स्टेशन परिसरातील निर्जन ठिकाणी आढळला होता. सकाळी मृतदेह सापडला आणि संध्याकाळपर्यंत त्याची ओळख पटली. हत्येतील आरोपी विवेक तिवारी हा मुरादाबाद येथील मेडिकल कॉलेजमध्ये योगिताचा वरिष्ठ आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक तिवारी योगितावर लग्नासाठी दबाव आणत होता. तिवारीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याचा दावा आहे की, योगिताशी त्याची ७ वर्षांची ओळख होती.
 
आग्राचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले की, योगिताच्या कुटुंबियांचा आरोप आहे कि डॉ. तिवारी योगिताला नेहमी फोन करुन धमकात असे. आरोपी तिवारी सध्या जालौन मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय अधिकारी आहे. आग्रा पोलिसांनी जालौन पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉक्टरला अटक केली. एसएसपीने सांगितले की, मारेकऱ्याची चौकशी सुरू आहे आणि यावरून बरीच माहिती समोर आली आहे.

आग्रामधील डॉ. योगिता गौतम खून प्रकरणात बर्‍याच गोष्टी समोर येत आहेत. हत्येतील आरोपी डॉक्टर विवेक तिवारीला हत्येनंतर योगिताचा मृतदेह जाळायचा होता, असे सांगितले जात आहे. या उद्देशानेच त्याने घटनास्थळी लाकडं गोळा केली होती. मात्र अद्याप याची खातरजमा झालेली नाही. आग्रा पोलिसांनी देखील अद्याप अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख केलेला नाही.