हैदराबाद एन्काऊंटर : युपी आणि दिल्ली पोलिसांनी धडा घ्यावा, मायावतींनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मायावतींनी तेलंगना पोलिसांचं कौतुक केलं आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी यातून धडा घ्यावा असंही मायावती यांनी म्हटलं आहे. महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.

मायावती म्हणाल्या, “उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र राज्य सरकार झोपलं आहे. खरंतर तेलंगनाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईपासून उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी प्रेरणा घ्यायला हवी. मात्र युपीमध्ये जंगलराज आहे. इथं मात्र गुन्हेगारांना सरकारी पाहुण्यासारखी वागणूक दिली जाते. है दुर्दैव आहे.” अशीही खंत मायावती यांनी व्यक्त केली आहे.

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी देखील या एन्काऊंटरचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “ज्या क्रूरतेनं दिशाचा बळी घेतला होता ते पाहता तिच्या कुटुंबियांचं दु:ख कधीच कमी होणार नाही. परंतु देशातील इतर मुलींच्या मनातील भीती मात्र कमी होईल.”

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे ही चिंतेची बाब आहे. सर्व नागरिकांनी मिळून याबाबत आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. देशातील न्यायव्यवस्था अधिक सदृढ बनवण्यासाठी तात्काळ पावलं उचलायला हवी.” अंसही ते म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like