UP Assembly Election 2022 | यूपीच्या राजकारणात भाजपला धक्के ! कॅबिनेट मंत्र्यांसह आमदारांचे राजीनामे; अखिलेश यादव म्हणाले…

लखनऊ : वृत्तसंस्था – UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेशसह पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणात (UP Assembly Election 2022) उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यूपी भाजपमधील (BJP) आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. मागील 3 दिवसांमध्ये भाजपच्या आठ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) आणि पर्यावरण मंत्री दारा सिंह चौहान (Dara Singh Chouhan) यांच्यानंतर आज (गुरूवारी) आणखी एका कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिला. आता योगी सरकारमधील (Yogi Government) आयुष मंत्री धर्म सिंह सैनी (Dharma Singh Saini) यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिलीय. त्यामुळे राजकारणात कालवाकालव होताना दिसत आहे.

 

धर्म सिंह सैनी यांच्या आगोदर औरैयामधील बिधुनाचे आमदार विनय शाक्य (MLA Vinay Shakya) आणि फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा (MLA Mukesh Verma) यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना पाठिंबा देत राजीनामे दिले आहेत. आमदार बाला प्रसाद अवस्थी (MLA Bala Prasad Awasthi) यांनी देखील राजीनामा दिला आहे. आज (गुरूवारी) दुपारपर्यंत भाजपच्या एक मंत्री आणि तीन आमदारांनी राजीनामे दिल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (UP Assembly Election 2022)

 

धर्म सिंह सैनी (Dharma Singh Saini) हे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत पक्षांतर करणार असल्याची मोठी चर्चा आहे. परंतु, त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी भाजपमध्ये आहे आणि पक्षातच राहणार, असे व्हिडिओ जारी करत याआधी म्हणाले होते. स्वामी प्रसाद मौर्य हे माझे मोठे भाऊ आहेत आणि मोठे भाऊ राहतील, असे व्हिडीओमध्ये सैनी यांनी म्हटले होते. तर, सैनी यांनी राजीनामा का दिला हे समजु शकलेल नाही. समाजवादी पार्टीत जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आपलेही नाव असल्याचे समजते, पण त्यांना न विचारता नावाचा समावेश केला आहे, हे चुकीचे आहे. मी याचे खंडन करतो. मी भाजपमध्ये आहे आणि भाजपमध्येच राहणार आहे, असं सैनी म्हणाले होते.

दरम्यान, सैनी यांनी आज (गुरुवारी) अचानक भाजपचा राजीनामा दिल्याची माहिती पसरली.
माध्यमांनी सैनी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
परंतु, त्यांचा मोबाइल बंद होता. त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे मोबाइल देखील बंद होते.
ते त्यांच्या सरकारी बंगल्यावर देखील हजर नव्हते.
त्यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबत गुप्त बैठक केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले ?
अखिलेश यांनी त्यांच्या सोबतचा एक फोटो ट्विट करत माहिती दिली आणि भाजपला टोलाही लगावला आहे.
ते म्हणाले, सामाजिक न्यायाचे आणखी एक योद्धा डॉ. धर्म सिंह सैनी यांच्या आगमनाने सर्वांना एकत्र आणू पाहणाऱ्या आमच्या ‘सकारात्मक आणि प्रगतीशील राजकारणाला’ अधिक उत्साह आणि बळ मिळाले आहे.
समाजवादी पार्टीत त्यांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा ! 2022 मध्ये सर्वसमावेशकतेचा आणि सौहार्दाचा विजय निश्चित आहे.

 

Web Title :-  UP Assembly Election 2022 | dharam singh saini and two mlas resign bjp yogi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा