UP Assembly Elections 2022 | यूपीच्या राजकारणात उलथापालथ ! CM योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा का दिला? जाणून घ्या

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – UP Assembly Elections 2022 | उत्तर प्रदेशसह आगामी पाच राज्याच्या निवडणुका (Five State Elections) फेब्रुवारी महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. एकीकडे तयारी जोरदार सुरू असताना दुसरीकडे पक्ष बदलांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. देशातील महत्वाचे राज्य म्हणून उत्तर प्रदेशकडे (UP Assembly Elections 2022) पाहिले जाते. मात्र याच राज्यातील राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारमधील (Yogi Government) विद्यमान मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी राजीनामा (Resigned) दिला. यानंतर सर्वत्र चर्चेला वेग आला. दरम्यान मौर्य यांनी नेमका राजीनामा का दिला? त्याचं कारण काय? जाणून घ्या.

 

कालपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली असल्याचं दिसलं आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी राजीनामा दिल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याबरोबरचे त्यांचे फोटो पसरले. आणि भाजपची चिंता वाढली. दरम्यान, 2017 मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबरोबर जे सदस्य निवडणूक आले होते, त्या सर्वांना पुन्हा तिकीट द्यावे अशी मौर्य यांची मागणी होती. अन्य 2 सहकाऱ्यांनाही या निवडणुकीसाठी तिकीट द्यावे, अशी मौर्य यांची मागणी होती. या त्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाजपने नकार दिला. कारण सर्वेनुसार 2017 मधील अनेक सदस्य या निवडणुकीत हारण्याची शक्यता वर्तवली जातेय. म्हणून त्यांना पुन्हा तिकीट द्यायचे की नाही यावर पक्ष विचार करत असल्याची माहिती भाजप सुत्रांकडून मिळाली आहे. (UP Assembly Elections 2022)

 

दरम्यान, मौर्य यांच्या एका समर्थकावर न्यायालयात काही खटले देखील सुरू आहेत. ते खटले मौर्य यांना संपवायचे होते. परंतु, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ते खटले मौर्य संपवू शकले नाहीत. निवडणुकीनंतर ते पूर्ण केले जाईल. असं आश्वासन त्यांना देण्यात आल्याचे समजते. मागील आठवड्यापासून स्वामी प्रसाद मौर्य आणि भाजप नेत्यांत वारंवार चर्चा सुरू होती. मौर्य त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. म्हणून पक्षात आणि त्यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.

दरम्यान, यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah)
यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांचे मन वळवण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांच्याकडे सोपवली आहे.
केशव प्रसाद मौर्य इतर असंतुष्ट असलेल्या राजीनामा दिलेल्या आमदारांचे मन वळवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे समजते.
तसेच युपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह (Swatantra Dev Singh)
आणि संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही (Sunil Bansal) या कामात गुंतले आहेत.
आज मंत्री दारा सिंह चौहान (Minister Dara Singh Chouhan) यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे.
त्यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार असल्याचं सुत्रांकडून समजते.

 

Web Title :- UP Assembly Elections 2022 | why did uttar pradesh minister swami prasad maurya resign yogi government in up

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन ‘कल्याणी प्रधान’ यांची आत्महत्या; पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ

 

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

 

Mayor Murlidhar Mohol | समाविष्ट गावांच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर मोहोळ