२० वर्षापुर्वीचा कोट्यावधींचा घोटाळा, ‘गॅलॅक्सी’ ग्रुपच्या संचालकांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गॅलॅक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र सीआयटी आणि उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत २० वर्षांपासून फरार असलेल्या संचालकांना अटक केली आहे. कंपनीविरोधात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सतीशचंद्र भगवतीप्रसाद मिश्रा (वय ६५, रा. संत कबीर नगर, खलीलाबाद) व रामकृष्ण प्रेमचंद दुबे (वय ५८, रा. संत कबीर नगर, खलीलाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर इतर आरोपी प्रमोदकुमार गंगा पांडे, रहेफिरदौस अफताब अहमद सिद्दीकी, घनशाम कालीप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दूलमाजीद, सतेंद्र वशिष्ठ त्रिपाठी या सर्वांना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काय आहे प्रकरण ?
गॅलॅक्सी ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत ५ कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व कंपन्यांची रजिस्टर ऑफ कंपनीज कानपूर येथे नोंद आहे. महाराष्ट्रात या कंपनीच्या १०२ शाखा आहेत. कंपनीने अधिक व्याजाचे अमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधींच्या ठेवी स्विकारत त्यांना कोणतीही रक्कम परत न करता १९९९ मध्ये ७ कोटी ८ लाख ४९ हजार २६६ रुपयांचा गंडा घातला होता. त्यानंतर कंपनी बंद करून आरोपी पसार झाले होते.

राज्यात कोठे गुन्हे दाखल आहेत ?
राज्यात वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशीम, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी येथे गुन्हे दाखल आहेत. तर राज्याबाहेर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

NBFC नोंदणीच नाही
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात या दोन्ही कंपन्यांची नोंदणी रिझर्व बँक ऑफ इंडीयाच्या गैर बँकींग कंपन्या (एनबीएफसी) म्हणून नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कंपनीला कोणत्याही ठेवी स्विकारण्याची परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले. कंपनीविरोधात सर्व गुन्ह्यांमध्ये उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

अनेक वर्षांपासून देत होते गुंगारा
दोषारोपपत्र दाखल करूनही महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभगाकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र ते अनेक वर्षांपासून गुंगारा देत होते. या गुन्ह्यात आतापर्यंत कंपनीची ४ कोटी ८६ लाख रुयांची मालमत्ता जप्त केली आहे.

उत्तम नियोजनामुळे अटक
उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या भऱारी पथकाने उत्तम नियोजन केल्याने वीस वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या संचालकांना अटक कऱण्यात आली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक (आर्थिक गुन्हे) जालिंदर सुपेकर, पोलीस अधिक्षक पल्लवी बर्गे, अप्पर पोलीस अधिक्षक (भरारी पथक) नरेंद्र गायकवाड, पोलीस उपअधिक्षक विलास भोसले, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक यशवंत निकम व पोलीस हवालदार कृष्णकांत देसाई, दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची