ISI एजंटच्या UP ATS नं आवळल्या मुसक्या

वाराणसी : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या दहशवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एका आयएसआय एजंटच्या मुसक्या आवळल्या आहेत. हा एजंट पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाशी संपर्कात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून सध्या या एजंटची कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशीद अहमद असे या आयएसआय एजंटचे नाव असून तो चंदौली जिल्ह्यातील चौरहण येथील रहीवासी आहे. तो 2018 मध्ये कराचीत राहणाऱ्या मावशीकडे गेला होता. त्याठिकाणी तो आयएसआयच्या संपर्कात आला. मार्च 2019 मध्ये पैशांच्या बदल्यात तो भारतातील महत्त्वाची ठिकाणे, सैन्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो पाठवण्याचे काम करत होता. या माहितीच्या मोबदल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्था रशीदला पैशांसह काही मौल्यवान भेटवस्तू पाठवत असल्याचे समोर आले आहे.

रशिद पाकिस्तानच्या संपर्कात
अटक करण्यात आलेल्या रशिदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून भारतीय गुप्तचर यंत्रणेने अटक केली आहे. याबाबत एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, रशिदने आतापर्यंत पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला भारतातील कोणत्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती पाठवली आहे, याबाबत माहिती घेतली जात आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानकडून रशिदला कोणत्या माध्यमातून पैशांची रसद पुरवली जात होती आणि कोणकोणत्या भेटवस्तू दिल्या गेल्या याची देखील माहिती एटीएसकडून घेतली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –