कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

अयोध्या : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये राम मंदिर ट्रस्टसाठी Ram Mandir Trust खरेदी करण्यात आलेल्या जमीन प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. दोन कोटी रुपयात खरेदी केलेली जमीन Land अवघ्या काही मिनिटानंतरच 18.5 कोटी रुपयात ट्रस्टने खरेदी केली आहे, ज्याविरूद्ध सपा, आम आदमी आणि काँग्रेसने Congress आक्रमक भूमिका घेतली आहे. अयोध्यामध्ये दोन कोटीच्या जमीनीवर साडेसोळा कोटींचा नफा कमावणार्‍या व्यक्तींची नावे सुल्तान अन्सारी Sultan Ansari आणि रवि मोहन तिवारी Ravi Mohan Tiwari आहेत. कोण आहेत हे सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी ज्यांच्याकडून राम मंदिर ट्रस्टने जमीन खरेदी केली आहे, ते जाणून घेवूयात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri Chinchwad Police | ‘वडगाव मावळ’, ‘कामशेत’, ‘लोनावळा शहर’, ‘लोनावळा ग्रामीण’ आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट?, जाणून घ्या सविस्तर

सुल्तान अन्सारीचे Sultan Ansari नाव आयोध्यामधील मोठ्या प्रॉपर्टी डिलर्सपैकी एक आहे. तर रवि मोहन तिवारी त्याचा पार्टनर आहे. सुल्तान अन्सरीच्या वडीलांचे नाव नन्हे मियां अन्सारी आहे. ते अयोध्यामधील असर्फी भवन चौकाजवळील कटरा मोहल्ला सुतौठी येथे राहणारे आहेत. सुल्तानचे वडील नन्हे मियां अयोध्यामधील जुन्या प्रॉपर्टी डिलरपैकी एक आहेत, ज्यांनी 2000 मध्ये जमीन खरेदी आणि विक्रीचे काम सुरू केले. हेच काम सुल्तान अन्सारी सुद्धा करू लागला आणि वडीलांना मदत करू लागला.

सुल्तान अन्सारीने निवडणुकीत सुद्धा नशीब अजमावले आहे.
2017 च्या अयोध्या नगर परिषदेच्या निवडणुकीत कटरा विभीषण कुंड वार्डातून सपा उमेदवार म्हणून सुल्तान अन्सारीने निवडणुक लढवली होती,
ज्यास भाजपाच्या BJP घनश्याम पहलवान यांची पत्नी चमेला देवीने Chamela Devi पराभूत केले होते.
इतकेच नव्हे, सुल्तान अन्सारी सपा पक्षाशी संबंधीत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सुल्तान अयोध्या सपा लोहिया वाहिनीचा महानगर अध्यक्ष होता.
राम मंदिर ट्रस्टसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन प्रकरणात त्याचे नाव केंद्रस्थानी आहे.

Pune News | खून का बदला खून ! ‘व्हॉट्सॲप’ स्टेटस ठेवून खून्नस दिल्याने केला निर्घृण ‘मर्डर’; भाच्याच्या खुनाचा बदला मामानं घेतला

अयोध्यामध्ये गट क्रमांक 243, 244, 246 ची जमीन जिची किंमत 5 कोटी 80 लाख रुपये आहे.
ती 2 कोटी रुपयात कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून सुल्तान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांनी खरेदी केली.
या जमीन खरेदीत 2 साक्षीदार होते, अनिल मिश्रा (श्री राम जन्मभूमी न्यास ट्रस्टचे सदस्य) आणि दुसरे ऋषिकेश उपाध्याय जे अयाध्याचे मेयर आहेत.

हिच जमीन त्याच दिवशी दहा मिनिटानंतर रामजन्मभूमी ट्रस्टने साडे 18 कोटीत खरेदी केली. यासाठी 17 कोटी रुपये सुल्तान अन्सारीच्या Sultan Ansari अकाऊंटमध्ये आरटीजीएस RTGS करण्यात आले.
अशाप्रकारे सुल्तान अन्सारीने अवघ्या 10 मिनिटात साडे 16 कोटी रुपयांचा नफा कमावला.

तर, राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय Champat Rai यांनी या आरोपांचे खंडन केले आहे
आणि हे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
राय यांनी म्हटले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने जेवढी जमीन खरेदी केली आहे,
ती बाजार भावापेक्षा खुप कमी किंमतीत खरेदी केली आहे.

Web Title : up ayodhya who is sultan ansari who earned 16 and a half crores from ram mandir trust

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या