‘निर्भया’ च्या आजोबांसोबत CMO नं केलं ‘गैरवर्तन’, विचारलं – ‘दिल्लीला का पाठवलं’ ?

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील निर्भयाच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. बलियाचे मुख्य तपासणी अधिकारी (CMO) यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. निर्भयाच्या गावी बलिया येथे निर्भयाच्या नावाने रुग्णालय बनवण्यात आले आहे. रुग्णालयात डॉक्टरांच्या मागणीसाठी निर्भयाचे नातेवाईक धरणे आंदोलन करत होते. तेथील रुग्णालयात आम्ही कोणताही डॉक्टर पाठवणार नाही असे तपासणी अधिकाऱ्याने सांगितल्याने निर्भयाच्या आजोबानी कोणीही निर्भयाचा अपमान करू नये असे म्हंटले आहे.

काय म्हंटले CMO ने
नातेवाईकांनी सांगितले की, बलिया येथील CMO ने म्हंटले की आजपर्यंत त्या गावातील कोणीही डॉक्टरकीचा अभ्यास केला नाही आणि त्यांना डॉक्टर पाहिजे. तसेच आधी डॉक्टरकीचा अभ्यास करा आणि मग त्याच रुग्णालयात काम करा असे अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. आम्ही कुठून डोक्टर आणू कारण जेवढे पद आहेत तेव्हढे डॉक्टर नाहीत.

नातेवाईकांच्या मते सीएमओने सांगितले की, रुग्णालय आम्ही बनवलेले नाही त्यामुळे ज्याने बनवले आहे त्यांच्याकडे डॉक्टरची मागणी करा. तसेच त्यांनी निर्भयावर देखील भाष्य केले ते म्हणाले निर्भया कोण आहे ? जर ती डॉक्टरकीचा अभ्यास करत होती तर दिल्लीला कशाला गेली ?

निर्भयाच्या गावी तिच्या नावाने रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता जेणेकरून गाववाल्यांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही. पाच वर्षांपूर्वी कसेबसे रुग्णालय तर उभे राहिले मात्र त्यामध्ये अद्याप डॉक्टर पोहचलेले नाहीत.

यामुळेच नाराज होऊन गाववाले आणि निर्भयाचे आजोबा धरणे आंदोलन करत होते आणि सीएमओ त्यांना आश्वासन देण्यासाठी पोहचले होते परंतु त्यांनी नातेवाईकांशी आणि गाव वाल्यांशी गैरवर्तन केले.