‘या’ कारणामुळं दलित बांधवांकडून जिल्हाधिकार्‍यांना महागडे बुट आणि घड्याळे गिफ्ट, ‘कलेक्टर’ हॅशटॅगमुळं ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील बलियाचे जिल्हाधिकारी भवानी सिंह यांनी दलितांबद्दल केलेल्या वक्त्यव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. त्याचबरोबर त्यांना नागरिक मोठ्या प्रमाणात बूट आणि घड्याळ पाठवत असून महागड्या गाड्या देखील पाठवत आहेत. #ShoesForTheDM या हॅशटॅगने त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्याचबरोबर दलित समाजाने या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात एकमोहीम उघडली आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

काय आहे हा प्रकार –

22 ऑगस्ट रोजी बलियाचे जिल्हाधिकारी भवानी सिंह यांना एका सरकारी शाळेत बोलाविण्यात आले. मात्र आपली महत्वाची बैठक सोडून आल्याने त्यांचा तिळपापड झाला होता. एका सरकारी शाळेत दलित मुलांना बाजूला बसवून मध्यान्न भोजन दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे बसपाच्या अनेक नेत्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यामुळे या प्रकरणी या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले. मात्र या ठिकाणी पोहोचल्यानंतर बसपा नेत्यांना पाहून भवानी सिंह यांचा तिळपापड झाला. त्याचबरोबर त्यांनी या नेत्यांवर टीका करत म्हटलं की, 25 लाख रुपयांची गाडी, 20 हजार रुपयांचे घड्याळ आणि 10 हजार रुपयांचे बूट घालून राजकारण करू नका. त्यानंतर या नेत्यांमध्ये आणि भवानी सिंह यांच्यात वाद झाला. या वादाचा व्हिडीओ त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

दरम्यान, त्यानंतर अनेक जणांनी नवीन बुटांचे फोटो पोस्ट करत त्यांना ट्रोल केले आहे. इतकेच नाही तर काही जणांनी त्यांना नवीन बुटांचे जोड देखील पाठवले आहेत. तर काही जणांनी महागड्या गाड्या आणि घडाळ्यांचे फोटो पोस्ट करत त्यांना ट्रोल केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त