70 वर्षाच्या वृद्धानं आपल्या 32 वर्ष जुन्या गाडीला बनवलं ‘हायटेक’, ‘हाक’ मारली की ‘स्टार्ट’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशातील बरेलीच्या एका व्यक्तीने आपल्या अनेक वर्ष जुन्या गाडीला मॉडिफाय केले आहे. याच गाडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून या गाडीचे नाव त्याने टारझन ठेवले आहे.

या गाडीच्या मालकाचे नाव मोहम्मद सईद असून त्यांनी या गाडीमध्ये एटीएम मशीन देखील बसवले आहे. त्याच्या आवाजावरूनच केवळ त्यातून पैसे काढता येतात. हनी सक्सेना नावाच्या व्यक्तीने युट्युबर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही वेळातच तो वेगाने व्हायरल झाला. अनेक नागरिक या गाडीचे कौतुक करताना दिसत आहेत. 10 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हाट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर देखील व्हायरल केला जात आहे.

मोहम्मद सईद यांचे वय 70 वर्ष असून त्यांनी या गाडीला टारझन सारखा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, हि गाडी त्यांच्या आवाजावरूनच सुरु होत असून यामधील एटीएम मशिनमधून त्यांच्या आवाजावरून पाच रुपयांचा शिक्का देखील निघतो.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी