किरकोळ वादातून आई आणि मुलींवर अ‍ॅसिड हल्ला, लेखापाल गजाआड

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातून पुन्हा एकदा अ‍ॅसिड हल्ल्याचं प्रकरण समोर आलं आहे. भदोही कोतवालीच्या परगासपूरमध्ये किरकोळ वादानंतर महिला आणि तिच्या दोन मुलींवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी लेखापालवर अ‍ॅसिड फेकण्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणी अद्याप अधिक कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी सध्या आरोपी लेखापालला ताब्यात घेतलं आहे. आई आणि तिच्या मुलींची अवस्था गंभीर आहे. त्यांना वाराणसीला हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नुकताच उत्तर प्रदेशच्या अलीगढ शहरातील क्वार्सी ठाणे भागात लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने तरुणावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना समोर आली होती. सदर पीडित तरुणाला मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते. घरच्यांनी नकार दिल्याने सदर युवक लग्नासाठी तयार नव्हता. दोघे एका भागात रहात होते. सदर पीडित तरुण कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याने तरुणीशी बोलणंही बंद केलं होतं. ती तरुणी मात्र सतत त्याला संपर्क करत होती. रागात येऊन तिने अखेर हे पाऊल टाकले.

Visit : Policenama.com