भाजपच्या महिला आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी, ISI चे नाव सुद्धा घेतले

इटावा : उत्तर प्रदेशच्या इटावातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) च्या आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. भाजपाच्या महिला आमदाराला पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या नावाने ठार मारण्याची देण्यात आली आहे. आमदारांना ज्या नंबरवरून धमकीचा मॅसेज आला, तो नंबर पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदाराने यासंबंधीची तक्रार इटावाच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

माहितीनुसार, इटावा विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार सरिता भदौरिया यांना एका नंबरवरून कुटुंबासह ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे सुद्धा नाव लिहिण्यात आले आहे. हा धमकीचा मॅसेज 30 जोनवारीला मिळाला.

भाजपा आमादाराने इटावाचे एसएसपी आकाश तोमर यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. एसएसपींनी आमदाराच्या तक्रारीवर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार सरिता भदौरिया यूपी महिला आणि बाल विकास कल्याण संयुक्त समिती इटावाच्या सभापती सुद्धा आहेत. त्यांना कुटुंबासह ठार मारण्याची धमकी पाकिस्तानातून मिळाल्याने पोलीस सुद्धा गडबडून गेले आहेत.